आरोग्य पथक पोचले सात हजार घरांपर्यंत...

tapasni
tapasni
Updated on

परभणी ः महापालिकेच्या आरोग्य पथकाने दहा प्रतिबंधीत क्षेत्रातील सात हजार घरातील ३३ हजारावर नागरिकांच्या आरोग्याची सलग चौदा दिवस दररोज तपासणी केली. सर्दी, ताप अशी लक्षणे असलेल्यांना पुढील तपासण्यांसाठी तत्काळ शासकीय रुग्णालयात पाठवल्यामुळे बहुतांश क्षेत्रात कोरोनाचा फैलाव रोखल्या गेल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात ती ८९ वर पोचली असून त्यामध्ये शहरातील २३ रुग्णांचा समावेश आहे. शहरात थेट उपचार सोडले तर संशयित रुग्णांची विलगीकरण कक्षात देखभाल, प्रतिबंधीत क्षेत्राचे निर्जंतुकीकरण, या क्षेत्रातील नागरिकांची दररोज आरोग्य तपासणी आदींची जबाबदारी पालिकेवर आहे.

शहरात आतापर्यंत २३ बाधित 
कारेगावसह शहराच्या विविध भागात आत्तापर्यंत २३ कोरोनाची बाधा झालेले रुग्ण आढळून आले असून अपवाद वगळता हे सर्व बाधित रुग्ण मुंबई, पुणे आदी सारख्या ठिकाणावरून आलेले आहेत. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या किंवा कुटूंबातील काही सदस्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे. शहरात दहा प्रतिबंधित क्षेत्रे असून त्या क्षेत्रात स्वच्छतेसह आरोग्य विषयक सुविधा देण्याची जबाबदारी पालिकेची आहे.

१६२ पथकांद्वारे सर्वेक्षण
महापालिकेने या दहा क्षेत्रात नागरिकांच्या आरोग्याची तपासणी, सर्वेक्षण आठ वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, आशा व अंगणवाडी स्वयंसेविकेच्या माध्यमातून केले. त्यासाठी १६२ पथके तयार करण्यात आली होती. प्रतिबंधीत क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांची सलग चौदा दिवस दररोज आरोग्य तपासणी केल्या जात होती. सर्दी, ताप, खोकला अशी सर्वसाधारण लक्षणेही आढळून आल्यास खबरदारी म्हणून त्यांना पुढील तपासणीसाठी पाठवले जात आहे. या दहा क्षेत्रातील सात हजार  ५९८ घरांतील ३३ हजार ९६१ नागरिकांची ही पथके दररोज तपासणी करीत आहेत. आत्तापर्यंत अल्प लक्षणे आढळून आलेल्या ३४ जणांना अधिकच्या तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु त्यातील एकही व्यक्ती बाधीत नसल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती, पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.

तीन प्रतिबंधित क्षेत्रे झाली खुली
शहरात दहा प्रतिबंधित क्षेत्रापैकी तीन क्षेत्रे आता खुली झाली आहेत. त्यामध्ये शहरात पहिला रुग्ण आढळून आला तो परिसर म्हणजे सुंदराईनगर एमआयडीसी, नागसेननगर व साखला प्लॅाट या ठिकाणी सर्व प्रत्येकी एक जण कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. त्या सर्वांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरीदेखील पाठवण्यात आले आहे. कालावधी पूर्ण झाल्यानंतर आता ही क्षेत्रे खुली झालेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com